वाहिरा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी (आष्टी)
संपूर्ण भारतभर अहिल्यादेवी होळकर यांचा ३०० वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठान व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कर्तबगार महिला व गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
वैद्यकीय अधिकारी विद्या ठाकूर, प्रा. स्वाती माळशिखरे, संजीवनीताई कोकणे (आदर्श शिक्षिका), आशाताई झांजे (कृषी अधिकारी), ह.भ.प. प्रांजली जाधव महाराज , प्रा.राम बोडखे , मेटे गुरुजी, सरपंच संभाजी गाडे, उपसरपंच भाऊसाहेब झांजे, प्रा. दादासाहेब झांजे , मा. सरपंच भाऊसाहेब आबा झांजे, फक्कड झांजे, दादा विधाते, प्रा. जाधव , गंगाधर आटोळे ग्रा. सदस्य, देविदास तोटे, सचिन माळशिखरे, गणेश माळशिखरे , जगदीश आटोळे, भाऊसाहेब मेटे, योगेश झांजे, नवनाथ झांजे , आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यादेवींचे कार्याचा गौरव मान्यवरांनी मनोगतपर भाषणातून केला. महिला आणि मुलींनी अहिल्यादेवी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास आपला सर्वांगीण उत्कर्ष साधला जाईल, असे मत डॉ. विद्याताई ठाकूर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.स्वाती माळशिखरे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रविण आटोळे यांनी केले . ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन ह.भ.प. किसन आटोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठान आणि उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.